Saturday, April 3, 2010

वेलडन राजस्थान...!


यावर्षीच्या आयपीएल मध्ये झालेला ३१ वा सामना चेन्नई व राजस्थान मध्ये झाला व राजस्थान हा सामना २३ रनांनी हरली. तरीही याच संघाला वेलडन म्हणावेसे वाटते. ज्यांनी हा सामना पाहिला असेल त्यांचीही कदाचित हीच प्रतिक्रिया असावी. कारण, राजस्थान समोर तब्बल २४६ धावांचे आव्हान होते तरीही त्यांनी १९ व्या षटकांपर्यंत या सामन्यात जान ठेवली होती. टी-२० च्या इतिहासात दुसऱ्या डावामध्ये सर्वाधिक धावसंख्या त्यांनी नोंदवली. राजस्थानचा डाव २० षटकांनंतर २२३ धावांवर थांबला.
या सामन्याची पहिली इनिंग्ज मला पाहायला मिळाली नाही. रेडिफ़वर जेव्हा धावसंख्या पाहिली तेव्हा चाटच पडलो. चेन्नईने २४६ धावांचा विक्रमी डोंगर उभा केला होता. प्रत्युतरात राजस्थानही १० च्या धावगतीने चालले होते. तेथूनच मी सामना पाहिला. इतक्या मोठ्या धावसंख्येचा पाठलाग करताना राजस्थानसारख्या संघाने दाखवलेली हिम्मत खरोखरच दाद देण्यासारखी वाटली. त्यांच्या संघात केवळ युसूफ़ पठाण व शेन वॉटसन हेच दोघे आंतरराष्ट्रीय दर्जाचे फलंदाज होते. त्यातही यूसूफ़ पठाणने दुसऱ्याच चेंडूवर विकेट टाकून दिली. परंतू, यष्टीरक्षक नमन ओझा व शेन वॉटसन यांनी वेगाने धावा करून राजस्थानची वाटचाल विजयाकडे वाटचाल चालू केली होती. चेन्नईचे समर्थक वगळून बाकी सर्वांनाच राजस्थानच्या विजयाची आशा असावी. ती मात्र पूर्ण झाली नाही. अखेरपर्यंत राजस्थान टीमने जी जिद्द दाखविली तिला सलाम...!

दोन्ही संघांच्या धावसंख्येमध्ये केवळ एका बोलिंजरचा फरक पडला. चेन्नईच्या या गोलंदाजाने त्याच्या निर्धारित चार षटकांत केवळ १५ धावा देऊन २ बळी मिळवले. अर्थात राजस्थानने उर्वरित १६ षटकांमध्ये २०८ धावा काढल्या आहेत...! शिवाय युसूफ़ पठाणचा अप्रतिम झेल घेऊन मोठी कामगिरीही त्याने करून दाखविली. म्हणूनच राजस्थान व चेन्नईत केवळ एका बोलिंजरचा फरक पडला, हे दिसून आले. अन्यथा विजय हा राजस्थान रॉयल्सचाच होता.

1 comment:

  1. Superb dear, I also missed to watch this match. I also excited to see this match but unfortunately I was in office.

    ReplyDelete

to: tushar.kute@gmail.com