Friday, June 4, 2010

How can it be justified?

I thought that can this news be the part of my blog? Can it be informative or anything else. Now, you tell me about this. This was published in yesterday's eSakal...


नोकरी गेल्याच्या संतापाने मोबाईल कंपन्यांना झटका
सकाळ वृत्तसेवा
Thursday, June 03, 2010 AT 12:15 AM (IST)

नांदेड - जिंतूरसारख्या (जि. परभणी) ग्रामीण भागातला रहिवासी, शिक्षण जेमतेम बारावीपर्यंत... अशी पार्श्‍वभूमी असलेला विशीतला युवक एका मोबाईल कंपनीच्या डिस्ट्रीब्युटरकडे नोकरी करतो. पुढे कंपनीमार्फत तो काम करू लागतो. हे करताना तो कोणताही अधिकृत अभ्यासक्रम पूर्ण न करता संगणकात पारंगत होतो. तरीही कंपनीने आपल्याला कामावरून काढून टाकल्याचा राग मनात धरून तो मोबाईल कंपन्यांनाच भंडावून सोडतो. डिस्ट्रीब्युटरच्या खात्यावरील टॉकटाईम तंत्रज्ञानाच्या साह्याने ओढून घेतो, काही ठिकाणचे नेटवर्कही बंद पाडतो आणि एके दिवशी पोलिसांच्या जाळ्यात अडकतो. एखाद्या चित्रपटात शोभेल असा हा प्रकार प्रत्यक्षात घडला आहे. या प्रकारामुळे नांदेड पोलिसही अचंबित झाले आहेत.

प्रसन्ना श्रीराम गुंडावार ऊर्फ पॅसी असे त्याचे नाव आहे. निरीक्षण, आकलन आणि स्मरणशक्ती मात्र दांडगी. बारावीपर्यंत शिक्षण झालेलं. पुढे शिकायचं तर आय.आय.टी. अशी जबरदस्त महत्त्वाकांक्षा; पण आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने शिक्षणाचा खर्च झेपणारा नाही. मात्र पॅसीला हे मान्य नाही. "खाईन तर तुपाशीच' या मानसिकतेत तो पुढील शिक्षण सोडून एका मोबाईल कंपनीच्या जिंतूर येथील डिस्ट्रीब्युटरकडे डेटा एन्ट्री ऑपरेटर म्हणून कामाला लागला. त्याने संगणकाचा कोणताही अभ्यासक्रम केला नसला तरी संगणकाच्या प्रत्येक प्रोग्राममध्ये असलेल्या "हेल्प' सुविधेचा फायदा घेऊन तो सगळं शिकला. इंटरनेटमध्ये त्याचे स्कील चांगले आहे. परंतु असे असले तरी संगणकातील बेसिक नॉलेज त्याच्याकडे नाही. डिस्ट्रीब्युटरकडे काम करताना त्याला दीड हजार रुपये महिना पगार मिळत असे.

पुढे पाच महिन्यांनंतर त्याला कंपनीने साडेतीन हजार रुपये मानधनावर नेमले. पुढच्या अडीच वर्षांत त्याचे मानधन पाच हजारांपर्यंत पोचले. कंपनीचे काम करताना तो डिस्ट्रीब्युटरच्या ग्राहकांचे "डॉक्‍युमेंट व्हेरीफिकेशन'चे (ऑडिट) काम करीत असे. त्याचाही वेगळा मोबदला मिळत असे. याशिवाय टेलिकम्युनिकेशनमधील अनेक कंपन्याचे, बॅक ऑफिसचेही काम त्याला जमते. अकाउंट ट्रॅन्झॅक्‍शनच्याही कामाचा त्याला अनुभव आहे. पॅसीला भाऊ नाही. वडील खासगी गुत्तेदारी करतात. एक लहान बहीण आहे. त्यामुळे पॅसीवर फारशी कौटुंबिक जबाबदारी नाही. इकडे कामाच्या बदल्यात त्याला महिन्याकाठी दहा ते अकरा हजार रुपये मिळत असत. हे पैसे तो मित्रकंपनीबरोबर चैनीत उडवत असे. पॅसीला गुटख्याचे व्यसन चांगलेच जडलेले आहे. अधूनमधून दारूही पितो.

पॅसीच्या एका भावाकडे मोबाईल कंपनीची एजन्सी होती; परंतु त्याचे आणि कंपनीचे खटकले आणि एजन्सी बंद पडली. परिणामी कंपनीने पॅसीलाही कामावरून कमी केले. याचा त्याच्या मनात राग बसला. एक जॉब गेल्यानंतर दुसरा जॉब शोधणे त्याने सुरू केले; पण ते त्याला कमालीचे अवघड गेले. औरंगाबाद येथे एका कॉल सेंटरमध्ये जॉब होता; पण पगार 4800 रुपये मिळू लागला. अकरा हजार रुपये महिना कमविण्याची चटक लागलेल्या पॅसीला हा जॉब पसंद पडला नाही. मोबाईल कंपनीत दुसरा अधिक पगाराचा जॉब मिळविण्यासाठी तो प्रयत्नशील होता. त्यासाठी लागणारे स्कील त्याच्याकडे होते; परंतु त्यासाठी एम.एच.सी.आय.टी. प्रमाणपत्राची अट होती. पॅसी इथे सिस्टीमला दोष देतो. माझ्याकडे संबंधित जॉबसाठी लागणारे पुरेसे किंबहुना तुलनेने अधिक ज्ञान असताना एका कागदासाठी अडवणूक झाल्याने इगो दुखावल्याचे त्याने पोलिसांच्या चौकशीत सांगितले.

या सर्व बाबींचा परिपाक म्हणजे पॅसीच्या मनात मोबाईल कंपनीला धडा शिकविण्याची भावना घट्ट रुजते. परिणामी इंग्रजी आणि गणितात सुरवातीपासूनच पारंगत असलेल्या आणि मोबाईल कंपनीत काम करून अनुभवानं शहाणा झालेल्या पॅसीने मोबाईल कंपनीच्या विविध डिस्ट्रीब्युटरच्या अकाउंटमधून बॅलन्स (टॉकटाईम) चोरणं सुरू केलं. अशाप्रकारे त्याने जवळपास आठ डिस्ट्रीब्युटर्सना भंडावून सोडले. कंपनीच्या जेव्हा ही बाब लक्षात आली तेव्हा त्यांनी ते बॅलन्स परतही मिळवले; परंतु यंत्रणेतील दोषही उघड झाला. आयडी पासवर्ड हॅक करणे आणि टॉकटाईम चोरणे ही त्याची पद्धत होती. एवढेच नव्हे, तर त्याने वसमत, सेनगाव (जि. हिंगोली) आणि देगलूर, नायगाव (जि. नांदेड) या चार तालुक्‍यांतील कंपनीच्या डिस्ट्रीब्युटर्सची "लॅपो' सिस्टीमही बंद पाडली. एवढ्यावरच तो गप्प बसला नाही तर "मीच हे केले' असे त्याने सांगायलाही सुरवात केली. बदला घेणे एवढाच यामागचा हेतू होता. आपले हे कृत्य आपल्याला पोलिस कोठडीत घेऊन जाईल, असे त्याला कधीच वाटले नाही, असे तोच स्वतः सांगतो.

बदल्याच्या भावनेने चुकीचा मार्ग
प्रसन्ना ऊर्फ पॅसीने नांदेड येथील आयडिया कंपनीचे डीलर सुनील शर्मा यांचा युजर पासवर्ड चोरून पावणेदोन लाखांचा टॉकटाईम चोरला. याप्रकरणी पोलिसांत अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल झाला होता. पोलिस उपअधीक्षक लक्ष्मीकांत पाटील यांनी कौशल्य वापरून तपास केला असता पॅसी जाळ्यात अडकला. वास्तविक कोणतीही गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नसलेला पॅसी केवळ बदल्याच्या भावनेने चुकीचे कृत्य करून पोलिसांच्या तावडीत सापडला. आपण जे करतोय ते चुकीचे आहे हे लक्षात आल्यानंतर त्याने "कारनामे' थांबवले आणि भविष्यात असे कधीही करणार नाही, असे तो कबूलही करतो. परंतू चूक ती चूकच. पॅसीने चुकीचा रस्ता सोडून चांगला मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी पोलिसांचीही भावना आहे.

No comments:

Post a Comment

to: tushar.kute@gmail.com