Showing posts with label Marathi Music. Show all posts
Showing posts with label Marathi Music. Show all posts

Friday, October 4, 2013

नारबाची वाडी: Review.

गंभीर विषयाला विनोदी फोडणी दिलेला चित्रपट म्हणजे... ’नारबाची वाडी’! टिपिकल कोकणात चित्रित झालेल्या चित्रपटाने सकस मराठी विनोदाची मेजवानी दिली आहे. गेल्या अनेक दिवसांत मराठी चित्रपटातील विनोद अधिक सकस होत असल्याचे दिसते. याच पठडीतील हा चित्रपट होय. सर्वसामान्यपणे विनोदनिर्मिती करताना कृत्रिमतेची झालर घालावी लागते. परंतु, ’नारबाची वाडी’ हा नैसर्गिक विनोदी चित्रपट आहे. दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांच्या अत्यंत प्रभावी भुमिका, मंगेश धाकडेचे प्रसंगानुरूप येणारे श्रवणीय संगीत, चित्रपटाचा वेग कुठेही न मंदावता त्याची सलगता जपणारे अदित्य सरपोतदारचे दिग्दर्शन व प्रामुख्याने गुरू ठाकूरची पटकथा, संवाद व गीते ही या चित्रपटाची बलस्थाने आहेत! दिलीप प्रभावळकर व मनोज जोशी यांना तोडच नाही. शिवाय निखिल रत्नपारखी, विकास कदम, किशोरी शहाणे, अतुल परचुरे यांनीही त्यांना उत्तम साथ दिलीय. ’देऊळ’ नंतर मंगेश धाकडेचे संगीत पुन्हा उत्तमच झालंय. चित्रपटाचे निम्मे यश हे गुरू ठाकूरमुळे आहे, असे म्हणायला हरकत नाही. त्याची ’नारू म्हणे...’ ही वचने फारच उत्तम, शिवाय ’गझाल खरी काय...’ व ’शबाय शबाय...’ ही दोन्ही गीते सुंदर जमून आलीयेत. 


नाशिकमध्ये या चित्रपटाचे दुसऱ्या आठवड्यात शोज वाढविण्यात आलेत! ४.५ रेटिंग्जचा हा चित्रपट ’Must watch' कॅटेगरीतला आहे!

Friday, May 17, 2013

मराठी संगीताविषयी थोडं हेही वाचा.

Sunday, July 4, 2010

या वर्षीचे टॉप टेन

’नटरंग’ या मोठ्या म्युझिकल हिट चित्रपटाने या वर्षीची सुरूवात झाली. मागील वर्षी अजय-अतुलच्या संगीताने मराठी चित्रपटसृष्टीची वेगळी वाटचाल सुरू झाली होती. या वर्षीची सुरूवातच दणकेबाज लावण्या असणाऱ्या चित्रपटाने झाली. यानंतर प्रदर्शित झालेले अनेक चित्रपट सांगितिक प्रयोग घेऊन आल्याचे दिसले. मराठी चित्रपटांत आता गाणी केवळ सोयीची म्हणून टाकली जात नाहित. त्यांना तांत्रिकतेची जोड मिळू लागली आहे. यंदा प्रथमच मराठी संगीतकाराला राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाला. त्याचेच हे फलित असावे. यावर्षी मराठी चित्रपटांतील गायक-गायिकेलाही राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. मराठी संगीत बदलले आहे, हे मात्र निश्चित! त्याची प्रचिती मागील सहा महिन्यांत प्रदर्शित झालेल्या मराठी चित्रपटांतील संगीतावरून दिसून आली. मराठी गीतांना लोकप्रिय करण्यात संगीतकारांबरोबरच गीतकार व गायकांचाही मोठा सहभाग दिसून येतो.
यंदाच्या अर्ध्या वर्षात तयार झालेल्या मराठी गीतांमधील टॉप टेन गीते मी निवडून काढली आहेत. ती खालीलप्रमाणे...

१. बावरा
प्रणयगीत
चित्रपट: क्षणभर विश्रांती
गायक: ऋषिकेश कामेरकर, अवधूत गुप्ते, जान्हवी अरोरा, शिल्पा पै
संगीत: ऋषिकेश कामेरकर
गीत: गुरू ठाकूर

२. भिजून गेला वारा
प्रणयगीत
चित्रपट: इरादा पक्का
गायक: क्षितीज तारे, निहिरा जोशी
संगीत: निलेश मोहरीर
गीत: अश्विनी शेंडे

३. का कळेना
प्रेमगीत
चित्रपट: मुंबई पुणे मुंबई
गायक: स्वप्नील बांदोडकर, बेला शेंडे
संगीत: अविनाश-विश्वजीत
गीत: ऋषिकेश रानडे

४. कधी तू
प्रेमगीत
चित्रपट: मुंबई पुणे मुंबई
गायक: ऋषिकेश रानडे
संगीत: अविनाश-विश्वजीत
गीत: ऋषिकेश रानडे

५. सांग ना रे मना
प्रेमगीत
चित्रपट: झेंडा
गायक: स्वप्नील बांदोडकर, वैशाली सामंत
संगीत: अवधूत गुप्ते
गीत: अवधूत गुप्ते

६. वाजले की बारा
लावणी
चित्रपट: नटरंग
गायिका: बेला शेंडे
संगीत: अजय-अतुल
गीत: गुरू ठाकूर

७. कधी कधी
विरहगीत
चित्रपट: इरादा पक्का
गायक: जावेद अली
संगीत: निलेश मोहरीर
गीत: अश्विनी शेंडे

८. भीमरूपी महारूद्रा
भक्तीगीत
चित्रपट: हुप्पा हुय्या
गायक: स्वप्नील बांदोडकर
संगीत: अजित परब
गीत: प्रकाश चव्हाण

९. अप्सरा आली
लावणी
चित्रपट: नटरंग
गायक: बेला शेंडे, अजय
संगीत: अजय-अतुल
गीत: गुरू ठाकूर

१०. विठ्ठ्ला कोणती झेंडा घेऊ हाती
शीर्षकगीत
चित्रपट: झेंडा
गायक: ज्ञानेश्वर मेश्राम
संगीत: अवधूत गुप्ते

Monday, January 25, 2010

आणखी एक सुवर्णक्षण.


२३ जानेवारी २०१०... मराठी चित्रपटसृष्टीतील आणखी एक सुवर्ण दिवस ठरला. या दिवशी मराठी चित्रपटांनी सात विविध श्रेणींमध्ये राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये बाजी मारली. मराठी चित्रपटसृष्टीला तीच्या उत्कृष्ट दर्जाची मिळालेली ही पावतीच आहे.
महाराष्ट्रीय चित्रपट रसिक हिंदीच्या मागे लागले असताना मराठी चित्रपट मात्र विविध पायऱ्या चढत उंची गाठत चालला आहे. ’जोगवा’ या चित्रपटाचा योग्य सन्मान राष्ट्रीय स्तरावर झाला. यापूर्वी या चित्रपटाने राज्य पातळीवर विविध पुरस्कार प्राप्त केले होते. ’जोगवा’च्या संगीताविषयी मला काही गोष्टी नमूद कराव्याशा वाटतात. मराठीतील सर्वोत्तम संगीत दिग्दर्शक कोण? हा प्रश्न आज जर विचारला तर एकच नाव समोर येते.. अजय-अतुल. या संगीतकार द्वयीने आजवर उत्तमोत्तम संगीत मराठी चित्रपटांना दिले आहे. त्यांच्या कोणत्याही चित्रपटाने संगीत ’नापास’ झालेले नाही. आज गाजत असलेल्या ’नटरंग’ चे संगीत याच द्वयीने दिले आहे. मराठी चित्रपटांना अजय-अतुल आज देत असलेले संगीत हिंदीच्या धांगडधिंगा संगीतापेक्षा कितीतरी पटींनी श्रेष्ठ आहे. याचा पुरावा राष्ट्रीय पुरस्कारामुळे मिळाला. पुरस्कार समितीने असे नमूद केले होते की, ’जोगवा’ ला संगीत देताना त्यांनी लोकसंगीतातील बारकावे अगदी उत्कृष्टरीत्या टिपले आहेत. चित्रपटाचे संगीत ऐकल्यावर याची प्रचिती मात्र निश्चितच येते. ज्यांना अजय-अतुलच्या या कसबाबद्दल माहिती नसल्यास त्यांनी खालील निवडक मराठी गाणी जरूर ऐकावीत:
गीत: मल्हार वारी. चित्रपट: अगं बाई अरेच्चा...!
गीत: आई भवानी. चित्रपट: सावरखेड... एक गाव.
गीत: चांगभलं. चित्रपट: तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं
गीत: लल्लाटी भंडार. चित्रपट: जोगवा.
यावरूनच अजय-अतुलच्या संगीतातील जादू कळून येईल. निदान त्यांच्यामुळे तरी मराठी भाषिक मराठी संगीत ऐकू लागतील!
दुसरी गोष्ट म्हणजे ’जोगवा’ला सर्वोत्कृष्ट गायक व गायिकेचाही पुरस्कारही मिळाला आहे. ’जीव रंगला’ हे गायक हरीहरन यांनी गायलेले कदाचित पहिलेच मराठी गीत असावे. त्याच गीतासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. श्रेया घोषालने या चित्रपटातील दोन गीते गायली आहेत. त्यातील ’जीव रंगला’ हे द्वंद्व गीत आहे. मराठी गाण्यासाठी दोन अमराठी गायकांना पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी. मराठी चित्रपट व संगीतासाठी हा शुभसंकेतच आहे. अमराठी गायकांनी मराठी संगीताला अधिकाधिक योगदान द्यावे, अशीच सर्व मराठी रसिकांची इच्छा आहे.
उपेंद्र लिमये हा राष्ट्रीय पुरस्कार मिळालेला पहिलाच मराठी नायक. खरोखर खूप आश्चर्य वाटते की, मागच्या ५५ वर्षांच्या कालावधीत एकदाही मराठी नायकाला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला नव्हता! उपेंद्रने ती पोकळी भरून काढली. त्याचे मनापासून अभिनंदन...! आपल्या मराठी चित्रपटांची भरभराट अशीच पुढे चालू राहो ही अपेक्षा...
हिंदी रसिकांच्या लाडक्या अमिताभ बच्चननेही ’विहीर’ हा मराठी चित्रपट काढला आहे. शिवाय तो अनेक चित्रपट महोत्सवात गाजतोही आहे. त्याचे यश पाहून ’बिग बी’ ने आणखी दोन मराठी चित्रपट काढायचे ठरविले आहे. विशेष म्हणजे पुढील काही काळात तो हिंदी चित्रपट तयार करत नाहीये. यातून मराठी भाषिकांनी काहीतरी बोध घेण्यासारखा आहे. आता निदान मधुर भांडारकर व आशुतोश गोवारीकर यासारख्या दिग्दर्शकांनी केवळ पैशाचे गणित न पाहता मराठी चित्रपटसृष्टीलाअ योगदान देण्याची वेळ आली आहे...

Monday, January 4, 2010

लेऊनी स्त्रीरूप भूलवी.... नटरंग... नटरंग... नटरंग...


२०१० या नव्या वर्षाची सुरुवातच ’नटरंग’ सारख्या दमदार चित्रपटाने झाली. पहिल्याच दिवशी अर्थात १ जानेवारीलाच हा चित्रपट मला पाहायचा होता. परंतु, वेळ मिळाला नाही. त्यामुळे ’सेकंड डे फर्स्ट शो’ ला जावे लागले. साधारण एक वर्षापूर्वीच या चित्रपटाबद्दल मी ऐकले होते. शिवाय झी टॉकीजचा चित्रपट असल्याने अपेक्षा होत्याच. त्या सर्व अपेक्षांची पूर्तता आज झाली. रविंद्र जाधव यांचा पहिलाच चित्रपट असल्याचे बिल्कुल वाटले नाही. कथा ही आनंद यादव यांच्या ’नटरंग’ या कादंबरीवर आधारलेली होती, परंतु ही कादंबरी मी वाचलेली नाही.
आनंद यादव यांची दमदार कथा, रविंद्र जाधव यांचे उत्कृष्ट दिग्दर्शन, अतुल कुलकर्णीचा सकस अभिनय, गुरू ठाकूर यांची अर्थपूर्ण, प्रासंगिक गीते व सर्वात महत्वाचे म्हणजे अजय-अतुल यांचे श्रवणीय संगीत ही या चित्रपटाची वैशिष्टे मानावी लागतील. यामुळेच चित्रपट खूप सुंदर जमून आलाय. फार वर्षांनी तमाशावर आधारीत मराठी चित्रपट मोठ्या पडद्यावर दिसला. त्यानेही आपल्या अपेक्षा पूर्ण करून दाखविल्या. दिग्दर्शकाने या चित्रपटाची वेग खूप छान ठेवलाय. त्यामुळे तो कुठेही संथ वाटत नाही. रविंद्र जाधव पूर्वी जाहिराती दिग्दर्शित करायचा. जाहीरातीमध्ये कमी वेळामध्ये बऱ्याच गोष्टी सांगायच्या असतात. त्या दिग्दर्शकाला जमून आल्यात. नायकाच्या प्रवासाचे चित्रण उत्तमरित्या चित्रित झाले आहे. (विशेषकरून अतुल कुलकर्णीने ’गुणा’च्या भूमिकेला घेतलेली मेहनत दिसुन आली.) त्यास अजय-अतुलच्या संगीताची साथही तितकीच मोलाची वाटली. त्यांची सर्व प्रासंगिक गाणी पुन्हा पुन्हा ऐकावीशी वाटतात. २०१० या वर्षाची सुरूवात तर मराठी चित्रपट सृष्टीसाठी चांगली झाली. आशा करूया की पूर्ण वर्षच या तऱ्हेने पार पडेल...

रसिक होऊ दे रंग चढू दे, रंग असा खेळाला,
साताजन्माची आज पुण्याई, लागू दे आज पणाला,
हात जोडतो आज आम्हाला, प्राण तुझा दे संग.....
नटरंग उभा.... ललकारी नभा....

ईश्वरा जन्म हा दिला प्रसवली कला, थोर उपकार.....
तुज चरणी लागली, मरणी कशी ही करणी करू साकार.....
मांडला नवा संसार, आता घरदार तुझा दरबार.....
पेटला असा अंगार, कलेचा ज्वार चढवितो झिंग.....
नटरंग उभा.... ललकारी नभा.....

’नटरंग’च्या गाण्यांची सीडी मिळवितानाची एक आठवण मला इथे नमूद करावीशी वाटते. मराठीविषय़ी जितकी जाण पुणे, मुंबईतल्या लोकांना आहे, तितकी नाशिकच्या लोकांना असल्याचे मला गेल्या चार वर्षात बिल्कुल वाटले नाही. मला शंका होती की, हा चित्रपट नाशिकमध्ये प्रसारित होतो कि नाही? कारण, दोन आठवड्यापूर्वी मला या चित्रपटाच्या गाण्यांची सीडीच मिळत नव्हती. ज्या दुकानात जावे तिथे एकतर ते मराठी चित्रपटांविषयीच अनभिज्ञ होते; तेव्हा ’नटरंग’बद्दल विचारणे म्हणजे मलाच गुन्हा वाटू लागला. हा कोणी खेडवळ माणुस आहे कि काय, अशा अविर्भावाने ते माझ्याकडे पाहात होते. नाशिकमध्ये मराठी चित्रपट वा गाण्यांची कदर केली जात नाही, असा माझा आजवरचा अनुभव आहे. मराठी चित्रपट पाहण्यासाठीही तुरळक प्रेक्षक असतात. अखेर ’नटरंग’ची सीडी मला ७-८ दुकाने पाहिल्यावर एका रस्त्यावरच्या सीडीच्या हातगाडीवर मिळाली. त्यानेही ती ’विकली एकदाची...!’ अशा अविर्भावात देऊन टाकली. असा अनुभव मला नाशिकमध्ये बऱ्याच वेळा आलेला आहे. यावरून इथे मराठीवादी पक्षांचे लोकप्रतिनिधी असले तरी, नाशिकची जनता मराठीप्रेमी आहे, असे म्हणने पूर्ण चुकिचे आहे.

Wednesday, December 30, 2009

मराठी में गाणेवाले गायक....

अगर किसी मराठी भाषिक व्यक्ती को ये पुछा जाय की, मराठी फ़िल्मोमें गानेवाले किसीभी पांच गायकोंके नाम बताओ. तो मुझे नहीं लगता की, ज़्यादा लोग इसका जवाब दे पायेंगे. अगर आपने ये सवाल मुझे पूछा तो मेरा जवाब सुन लो. मराठी फ़िल्मों के लिये गानेवाले गायक है... शंकर महादेवन, श्रेया घोषाल, सुनिधी चौहान, कुणाल गांजावाला, और सोनू निगम. कितने लोगोंको पता है की, इन गायकोंने मराठी फ़िल्मोंमें बहुत से गाने गाये हैं.
शुरूआत शंकर महादेवन से करते है. सबसे पहली बात यह है के, शंकरजी गजानन खळे को अपना गुरू मानते है. अगर आप थोडासा भी मराठी संगीत से वाकीफ़ है, तो यह जानते होंगे की, गजानन खळे मराठी के एक बड़े संगीतकारों में से एक है. मराठी में शंकर महादेवन का पहला हिट गाना ’मायेच्या हळव्या स्पर्शाने खुलते..’ यह ’अगं बाई अरेच्चा...’ फ़िल्म से था. आज भी लोगोंकी होटोंपर यह गाना गूंजता है. इस गाने को संगीत दिया था, मशहूर संगीतकार अजय-अतुल ने. इस गाने से पहले भी अजय-अतुल ने शंकर महादेवन से अपने अल्बम ’विश्वविनायक’ में ’गणदैवताय...’ यह गाना गॅंवाया था. शंकर महादेवन ने अजय-अतुल के संगीत निर्देशन में ही कई गाने गाये है. उन्हें ’बंध प्रेमाचे’ फ़िल्म में गाये हुए ’चिंब भिजलेले...’ गाने के लिये झी गौरव पुरस्कार प्राप्त हुआ है. इस के अलवा शंकर महादेवन के अन्य कुछ हिट गाने इस तरह है-

सोनपैंजना...: फ़िल्म: आम्ही सातपुते.
कंठ आणि आभाळ...: फ़िल्म: सरीवर सरी
वळणावरी...: अल्बम: मनरंग

मराठी में गानेवाली दूसरी गायिका श्रेया घोषाल है. उन्होने अपने सुमधूर आवाज से कई गाने गाये है. उन की सुची कुछ इस तरह है-

डोहाळे पुरवा...: फ़िल्म- इश्श...
मनात माझ्या वनपाचूचे...: अल्बम- मस्त शारदिय रात
मेंदी भरल्या पाऊली...:अल्बम- मस्त शारदिय रात
जीव रंगला...: फ़िल्म- जोगवा
मन रानात गेलं गं...:फ़िल्म- जोगवा
सूर आले शब्द ल्याले...: फ़िल्म: सुंदर माझे घर

इन के अलवा श्रेयाजी का ’माझी गाणी’ यह मराठी अल्बम भी बाजार में है.

सुनिधी चौहान ने अपने रफ़ एण्ड टफ़ आवाज से मराठी में भी गूंज शुरू की है. उन के गानों की सूची इस तरह है-

कांदेपोहे...: फ़िल्म- सनई चौघडे
आता कशाला उद्याची बात...: फ़िल्म- मेड इन चायना
देही वणवा...: फ़िल्म- हाय काय नाय काय
हाय काय नाय काय...: शीर्षक गीत.

कुणाल गांजावाला तो मराठी के पुराने गायक है. ’सावरखेड एक गाव’ के ’वाऱ्यावरती गंध पसरला...’ इस गाने से वो मराठी में मकबूल हुए. उन्होने भी अजय-अतुल के संगीत निर्देशन में ही अधिकतर गाने गाये है. उन की सूची...

ओठ ओलावले...: फ़िल्म- शुभमंगल सावधान
साडे माडे तीन...: शीर्षक गीत

सोनू निगम को मराठी में लाने मे सचिन पिळगावकर का बडा हाथ है. उन के ’नवरा माझा नवसाचा’ इस फ़िल्म से सोनू निगम ने मराठी में गाने को शुरूआत की थी. उन के गानों की सूची:

हिरवा निसर्ग...: फ़िल्म- नवरा माझा नवसाचा
आम्ही प्रेमामध्ये पडलोया...: फ़िल्म- आम्ही सातपुते
ही सुगंधी हवा...: फ़िल्म- सावरिया.कॉम

इस सब के अलवा हरिहरन, कविता कृष्णमूर्ती, शान, उदित नारायण, सुमित्रा अय्यर, महालक्ष्मी अय्यर, सोनू कक्कड, विनोद राठोड इस गायकों ने भी मराठी फ़िल्मों और अल्बम्स में कई गाने गाये है. पुराने जमाने में किशोर कुमार ने तीन और मोहम्मद रफ़ी ने ५-६ गाने मराठी में गये थे. मगर उन मे और आज के गायकों में मुझे यह फ़र्क नजर आया के, आज के गायकों ने मराठी के ’ळ’, ’च’, ’ज’ का उच्चारण बखुबीसे किया है. इस से पता नही चलता के वह मराठी गायक नही है.
आशा करता हूं कि सब की यह श्रृंखला इसी तरह कायम रहेगी......