विकिपीडियाच्या ह्या लिंक वरून काढलेली खालील आकडेवारी पहा. 'एथोनॉलॉग' या जगप्रसिद्ध भाषांची माहिती ठेवणाऱ्या कॅटलॉगने सदर तालिका सन 2019 मध्ये प्रसिद्ध केली आहे. सर्वात अभिमानाची गोष्ट म्हणजे आपली मातृभाषा 'मराठी' या तालिकेत जगात दहाव्या क्रमांकावर आहे. ही आकडेवारी प्रथम भाषा बोलणार्या लोकांची आहे. यात एकाच भाषेचे विविध प्रकार वगळण्यात आलेले आहेत. भारतीय भाषांचा विचार केल्यास देशात मराठी ही हिंदी व बंगाली नंतर तिसऱ्या तर जगात चौथ्या क्रमांकाची भाषा आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे पहिल्या दहामध्ये मराठी ही अशी एकमेव भाषा आहे, जी फक्त एकाच देशात बोलली जाते! अशी मराठी भाषा बोलत असल्याचा आम्हाला अभिमान वाटतो!
Showing posts with label मराठी. Show all posts
Showing posts with label मराठी. Show all posts
Monday, October 21, 2019
Monday, October 14, 2019
मराठीत बोला आणि लिहा सहजपणे...
इंटरनेटवर आज मोठ्या प्रमाणात मराठी भाषेतून लेख कविता ब्लॉग्स व ई-बुक उपलब्ध झालेले दिसतात. हा सारा सृजनशील पसारा वेगाने वाढत चाललाय. मराठी भाषेसाठी इंटरनेट व त्यावर लिहिली जाणारी मराठी आज एक प्रकारे टेक्नो-संजीवनीच काम करीत आहे. ज्यांना आपल्या भाषेत व्यक्त व्हायचंय, त्यांच्यासाठी अनेक मुक्त व्यासपीठ इंटरनेट मी उपलब्ध करून दिलीत.
आज वाचकांची संख्या लेखकांपेक्षा जास्त असली तरी प्रत्येक वाचतात एक सुप्त लेखक घडल्याचा दिसतो. अनेक जणांना लिहायचं असतं. इंटरनेटद्वारे व्यक्त व्हायचं असतं, परंतु लिहायचं कसं? हा पहिला प्रश्न पडतो. फॉन्ट कोणता? सॉफ्टवेअर कोणते? कसे टाईप करायचं? असे अनेक प्रश्न मराठी लेखकांना पडतात. युनिकोड व नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग द्वारे मराठी भाषा आता सहजपणे संगणकात वापरता येऊ लागलीये. ही सर्व संगणक तंत्रज्ञानाची किमया आहे. संगणकात मराठीसाठी कोणताही फॉन्ट वापरला जात नाही. युनिकोडच्या साह्याने इंग्रजी सारखीच अन्य कोणतीही भाषा आपण संगणकात सहजपणे वापरू शकतो. त्यासाठी विविध प्रकारचे एडिटर्सही उपलब्ध झाली आहेत. यातीलच बहुतांश एडिटर्स हे गुगल ट्रान्सलिटरेशन ची मदत घेतात. याद्वारे कोणीही सहजपणे मराठीत टाईप करू शकतो. अनेकांना तर टाईप करण्याचा व लिहायचाही कंटाळा असतो. त्यासाठी ही विविध सुविधा अँड्रॉइड ऍपच्या साह्याने उपलब्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंक वर असेच एक सुलभ ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलचे 'स्पीच टू टेक्स्ट' तंत्रज्ञान वापरून हे ऍप मराठीत बोललेली माहिती टेक्स्ट मध्ये अर्थात संगणकात मराठी भाषेत आपोआप टाईप करून दाखविते. विशेष म्हणजे यात आपले बोलणे मराठी टाईप करून अन्य भाषेत भाषांतरित करण्याचीही सुविधा आहे! जेव्हा तुम्ही सदर ॲप इन्स्टॉल करून उघडाल तुम्हाला वरच्या बाजूला पाच आयकॉन्स दिसतील. त्यातील मधल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला फक्त आपल्या भाषेत स्पष्टपणे बोलायचं आहे. जसजसे तुम्ही बोलत जाल तसे या ॲपच्या एडिटरवर टाईप होत जाते. विशेष म्हणजे सदर ॲपचा वेग खूपच चांगला असून असून त्याची अचूकता 99% मानायला काहीच हरकत नाही. एडिटरमध्ये टाईप झालेले मराठी वाक्य तुम्ही दुसरीकडे कुठेही थेट कॉपी व शेअरही करू शकता. ॲप वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक की, तुमचं मोबाईल इंटरनेटला जोडलेला असायला हवा.
असं हे मराठीतले एक सुंदर ऍप आहे. चला तर मग ते वापरूया व इंटरनेटवरची मराठी समृद्ध करूयात.
आज वाचकांची संख्या लेखकांपेक्षा जास्त असली तरी प्रत्येक वाचतात एक सुप्त लेखक घडल्याचा दिसतो. अनेक जणांना लिहायचं असतं. इंटरनेटद्वारे व्यक्त व्हायचं असतं, परंतु लिहायचं कसं? हा पहिला प्रश्न पडतो. फॉन्ट कोणता? सॉफ्टवेअर कोणते? कसे टाईप करायचं? असे अनेक प्रश्न मराठी लेखकांना पडतात. युनिकोड व नॅचरल लँगवेज प्रोसेसिंग द्वारे मराठी भाषा आता सहजपणे संगणकात वापरता येऊ लागलीये. ही सर्व संगणक तंत्रज्ञानाची किमया आहे. संगणकात मराठीसाठी कोणताही फॉन्ट वापरला जात नाही. युनिकोडच्या साह्याने इंग्रजी सारखीच अन्य कोणतीही भाषा आपण संगणकात सहजपणे वापरू शकतो. त्यासाठी विविध प्रकारचे एडिटर्सही उपलब्ध झाली आहेत. यातीलच बहुतांश एडिटर्स हे गुगल ट्रान्सलिटरेशन ची मदत घेतात. याद्वारे कोणीही सहजपणे मराठीत टाईप करू शकतो. अनेकांना तर टाईप करण्याचा व लिहायचाही कंटाळा असतो. त्यासाठी ही विविध सुविधा अँड्रॉइड ऍपच्या साह्याने उपलब्ध झालेल्या आहेत. खाली दिलेल्या लिंक वर असेच एक सुलभ ॲप गूगल प्ले स्टोअरवर उपलब्ध आहे. गुगलचे 'स्पीच टू टेक्स्ट' तंत्रज्ञान वापरून हे ऍप मराठीत बोललेली माहिती टेक्स्ट मध्ये अर्थात संगणकात मराठी भाषेत आपोआप टाईप करून दाखविते. विशेष म्हणजे यात आपले बोलणे मराठी टाईप करून अन्य भाषेत भाषांतरित करण्याचीही सुविधा आहे! जेव्हा तुम्ही सदर ॲप इन्स्टॉल करून उघडाल तुम्हाला वरच्या बाजूला पाच आयकॉन्स दिसतील. त्यातील मधल्या आयकॉनवर क्लिक करून तुम्हाला फक्त आपल्या भाषेत स्पष्टपणे बोलायचं आहे. जसजसे तुम्ही बोलत जाल तसे या ॲपच्या एडिटरवर टाईप होत जाते. विशेष म्हणजे सदर ॲपचा वेग खूपच चांगला असून असून त्याची अचूकता 99% मानायला काहीच हरकत नाही. एडिटरमध्ये टाईप झालेले मराठी वाक्य तुम्ही दुसरीकडे कुठेही थेट कॉपी व शेअरही करू शकता. ॲप वापरताना एक गोष्ट लक्षात ठेवायची एक की, तुमचं मोबाईल इंटरनेटला जोडलेला असायला हवा.
असं हे मराठीतले एक सुंदर ऍप आहे. चला तर मग ते वापरूया व इंटरनेटवरची मराठी समृद्ध करूयात.
Friday, July 20, 2012
"हुरुफ़े हल्की"
उर्दू ही मूळची भारतीय भाषा असली तरी
लिपी ही अरेबियन लिपी आहे. अरेबियन व पर्शियन
भाषा लिहिण्यासाठी या लिपीचा वापर होतो. प्रत्येक
लिपीचे स्वत:चे विशिष्ट उच्चार
असतात. तसेच उर्दूचेही आहेत. अर्थात अरबी लिपीतीलच हे उच्चार
उर्दूतही वापरण्यात येतात.
![]() |
| उर्दू मुळाक्षरे. |
भारतीय भाषांतील स्वर व व्यंजनांचे
उच्चार, हे बहुतांश सारखेच
आहेत. परंतु, उर्दूची लिपी ही परकीय असल्याने तिच्यात
काही मूळ अरबी उच्चारही समाविष्ट आहेत. व
विशेष म्हणजे अरबीतही न वापरण्यात येणारे उच्चार उर्दूत समाविष्ट केले आहेत. तीच्या भारतियत्वाचा
हा प्रभाव असावा. त्यामुळेच उर्दू व
अरबी मुळाक्षरे यांत काही प्रमाणात फरक दिसून येतो. जसे अरबी भाषेत ’प’ हे अक्षरच नाही. परंतु, उर्दूमध्ये आहे. भारतीय भाषांतील ’प’ चा उच्चार अरेबियन
’ब’ असा करतात. भारतीय भाषांच्या
प्रभावाने उर्दूचा अक्षरसंग्रह वाढला, हे
मात्र नक्की!
अरेबियन लिपीत सहा अशी अक्षरे आहेत
ज्यांना ’हुरूफ़े हल्की’ असे म्हणतात. हुरूफ़
म्हणजे मुळाक्षर व हलक म्हणजे ’कंठ’ होय. ज्या
मुळाक्षरांचा उच्चार कंठातून केला जातो, त्यांना
’हुरूफ़े हल्की’ असे म्हणतात. मूळ उर्दू व अरबी
भाषिकांनाच याचा उच्चार व्यवस्थित करता येतो. ज्यांना ’हुरूफ़े हल्की’चा उच्चार नीट
येतो, त्यांनाच उर्दू भाषा
बोलता येते, असे म्हणतात! सहा अक्षरांना ’भारतीय’ उच्चारही आहेत. बहुतांश जण मूळ अरबी उच्चारांऐवजी
भारतीय उच्चार या शब्दांसाठी करतात.
याचे
विवेचन खालीलप्रमाणे:
१) ع (ऐन) - उदा. ऐनक
याऐवजी उच्चार: ا (अलिफ़).
२) غ (ग़ैन) -
उदा. ग़ुलाम
याऐवजी उच्चार: گ (गाफ़)
३) ح (हे) -
उदा. हलवा
याऐवजी उच्चार: ہ (हे)
४) خ (ख़े) -
उदा. ख़ुदा
याऐवजी उच्चार:
کھ (ख)
५) ق (क़ाफ़) -
उदा. क़लम
याऐवजी उच्चार: ک (काफ़)
६) ف (फ़े) -
उदा. फ़िक़्र
याऐवजी उच्चार: پھ (फ)
यातील ग़, ख़, क़, आणि फ़ या उच्चारांचा वापर हिंदीतही
करण्यात येतो. परंतु, यातील बहुतांश शब्द हे उर्दूतून घेण्यात
आलेले आहेत.
Tuesday, May 1, 2012
माझ्या नव्या ब्लॉगचे अनावरण...
मित्रांनो, आपला महाराष्ट्र हा विविधतेने नटलेला आहे. महाराष्ट्रातील अशी कितीतरी ठिकाणे आहेत की, जी मराठीजनांनाही माहित नाहीत. आपल्या महाराष्ट्राची माहिती इथल्या मराठी भाषिकांना व्हावी म्हणून मी आज माझ्या नव्या ब्लॉगचे अवतरण करत आहे. त्याचे नाव आहे-
“येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...”
व पत्ता आहे...
http://maharashtradeshi.blogspot.in

या ब्लॉगला नक्की भेट द्या. येत्या वर्षामध्ये इथे मुबलक माहिती उपलब्ध होईल. पुढील १ मे रोजी मी पुन्हा याच ब्लॉगचा आढावा प्रसिद्ध करेल.
तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे मी स्वागत करतो...
“येथल्या दरीदरीत हिंडते मराठी...”
व पत्ता आहे...
http://maharashtradeshi.blogspot.in

या ब्लॉगला नक्की भेट द्या. येत्या वर्षामध्ये इथे मुबलक माहिती उपलब्ध होईल. पुढील १ मे रोजी मी पुन्हा याच ब्लॉगचा आढावा प्रसिद्ध करेल.
तुमच्या प्रतिक्रिया व सूचनांचे मी स्वागत करतो...
Monday, March 12, 2012
श्रेया घोषाल: मराठी टॉप टेन
भारतातील आजची सहा प्रमुख भाषांतील पार्श्वगायिका श्रेया घोषाल यांचा आज वाढदिवस आहे. त्यांनी मराठी भाषेत मराठी मातृभाषिक गायकांनाही लाजवेल अशा सुरांत अनेक गाणी गायली आहेत. त्यातील टॉप टेन गाणी मी इथे देत आहे. जमलं तर ऐकुन बघा....
१. जीव दंगला (जोगवा)
२. अजुन तरळते (माझी गाणी-अल्बम)
३. मन रानात गेलं गं (जोगवा)
४. सूर आले शब्द ल्याले (सुंदर माझे घर)
५. मेंदी भरल्या पावुली (मस्त शरदीय रात-अल्बम)
६. चंचल हा मनमोहन (माझी गाणी-अल्बम)
७. गार गार हा पवन बावरा (अर्जुन)
८. डोहाळे पुरवा (इश्श)
९. मंगळागौरी (मणी मंगळसूत्र)
१०. ऐकुन घे ना रे मना (स्वप्न तुझे नी माझे)
====================================================================
१. जीव दंगला (जोगवा)
२. अजुन तरळते (माझी गाणी-अल्बम)
३. मन रानात गेलं गं (जोगवा)
४. सूर आले शब्द ल्याले (सुंदर माझे घर)
५. मेंदी भरल्या पावुली (मस्त शरदीय रात-अल्बम)
६. चंचल हा मनमोहन (माझी गाणी-अल्बम)
७. गार गार हा पवन बावरा (अर्जुन)
८. डोहाळे पुरवा (इश्श)
९. मंगळागौरी (मणी मंगळसूत्र)
१०. ऐकुन घे ना रे मना (स्वप्न तुझे नी माझे)
====================================================================
Sunday, March 11, 2012
संगणकाचे प्रकार
मित्रांनो, मी सध्या नितीन प्रकाशनाच्या ’ज्ञानसागरातील शिंपले’ या पुस्तकांच्या श्रुंखलेतील पुढच्या पुस्तकाचे लेखन करित आहे. त्यात समाविष्ट असलेल्या एका लेखाचीच ही झलक-
७. संगणकाचे प्रकार
संगणकाच्या आकारानुसार तसेच वेगानुसार त्याचे प्रामुख्याने चार प्रकार पडतात- सुपर कॉम्प्युटर, मेनफ्रेम कॉम्प्युटर, मिनी कॉम्प्युटर व मायक्रो कॉम्प्युटर इत्यादी. सुपर कॉम्प्युटर हा सर्वात वेगवान संगणक होय. हवामान अंदाज, उपग्रह प्रक्षेपण, मोबाईल कम्युनिकेशन यासारख्या विशिष्ट कामांकरिता हे संगणक वापरले जातात. त्यांचा वेग हा खूप जास्त असतो. तो ’फ्लॉप्स’ या एककात मोजला जातो. शासकिय संस्थांव्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांमध्येही सुपर कॉम्प्युटर वापरले जातात. सीडॅकने तयार केलेला. ’परम’ हा भारताचा पहिलाच महासंगणक अर्थात सुपर कॉम्प्युटर होता. अशा संगणकांचा हाताळण्यासाठी विशिष्ट संगणक प्रणालीची गरज असते. सुपर कॉम्प्युटर पेक्षा आकाराने लहान व वेगाने कमी असणारा संगणक म्हणजे मेनफ्रेम कॉम्प्युटर होय. १९६० च्या दशकात मोठ्या प्रमाणावर अशा प्रकारच्या संगणकांची निर्मिती झाली होती. आजही अनेक कंपन्यांकडे असे संगणक उपलब्ध आहेत. जिथे सुपर कॉम्प्युटरची गरज नसून अधिक कार्य करायचे असते, अशा ठिकाणी मेनफ्रेमचा वापर होतो. मेनफ्रेमपेक्षाही कमी आकाराचा व कमी वेग असणारा संगणक म्हणजे मिनी कॉम्प्युटर होय. आज अशा प्रकारचे संगणक वापरले जात नाही. ८० च्या दशकात शेवटचा मिनी कॉम्प्युटर वापरण्यात आला होता. मेनफ्रेमपेक्षा कमी आकाराचा संगणक तज्ञांनी बनविल्याने त्याला मिनी कॉम्प्युटर असे नाव दिले गेले होते. आज मिनी कॉम्प्युटरचे नामोनिशान केवळ संग्रहालयांत दिसून येते. आपल्या घरी किंवा महाविद्यालयांत जो संगणक वापरण्यात येतो त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे म्हणतात. सन १९८० नंतर वैयक्तिक संगणकाचे युग अवतरल्यावर त्याला मायक्रो कॉम्प्युटर असे नाव दिले गेले. पूर्वीच्या खोलीएवढ्या मोठ्या संगणकांपेक्षा हा संगणक अतिशय लहान असल्याने त्याला हे नाव सार्थक होते. मायक्रो कॉम्प्युटरचे डेस्कटॉप व लॅपटॉप असे दोन प्रकार पडतात. डेस्कटॉप म्हणजे टेबलावर व लॅपटॉप म्हणजे मांडीवर ठेवून वापरता येण्यासारखा कॉम्प्युटर होय. आता हाताच्या तळव्यावर मावेल असा पामटॉप नावाचा कॉम्प्युटरही लोकप्रिय होत आहे. काही वर्षांनी फिंगरटॉप नावाचे संगणक बाजारात आले तर आश्चर्य वाटायला नको.
Monday, January 23, 2012
संगणक व्हायरसच्या विश्वात
संगणक वापरकर्त्यांना सर्वात जास्त घाबरविणारी गोष्ट म्हणजे व्हायरस होय. व्हायरस म्ह्टले म्ह्टले की, भल्याभल्यांची भांबेरी उडते. आपल्या संगणकात व्हायरस कसा येणार नाही, याची काळजी आपापल्या परीने प्रत्येक जणच घेत असतो. कॉम्प्युटर विकत घेताना त्याच्यासोबत अँटीव्हायरस आहे का याची काळजी प्रत्येकालाच घ्यावी लागते कारण नावाप्रमाणेच व्हायरस अर्थात विषाणू हे विंडोज असणाऱ्या संगणकाला होणाऱ्या विविध रोगांना कारणीभूत ठरत आहेत असेच जगातील सर्वात खतरनाक १० व्हायरस पुढीलप्रमाणे-
क्रमांक १०- मेलिसा
१९९९ मध्ये डेव्हिड स्मिथ नावाच्या संगणक तज्ञाने याची निर्मिती केली होती मायक्रोसॉफ्ट वर्डच्या ’मॅक्रो’ या संकल्पनेवर हा व्हायरस कार्य करतो. ईमेल द्वारे हा व्हायरस कार्यान्वित झाल्यावर ईमेलद्वारेच ते समोरच्या व्यक्तिला सुचना करतो की तुम्हाला हवी असलेली फ़ाईल आम्ही ता मेलने पाठवली आहे व एकदा ही फ़ाईल डाऊनलोड झाली की या व्हायसरचे काम चालू होते पुन्हा त्याच मेल बॉक्स मधून ५० जणांना असाच मेल पाठवला जातो.१९९९ साली वेगाने या व्हायरसचा प्रसार झाला शिवाय डेव्हिड स्मिथला या व्हायरसचा प्रसार केल्यामुळे पाच हजार डॉलरच्या दंडाची शिक्षा व २० महीने कैदही झाली आहे.
क्रमांक ९- आय लव्ह यू
फ़िलिपाईन्स मध्ये २००० साली तयार झालेला व ईमेलनेच प्रसार होणारा हा व्हायरस होय. ईमेलमधून हा व्हायरस संदेश प्रसारीत करतो की तुमच्या गुप्त प्रेमिकेने तुम्हाला प्रेमसंदेश पाठविला आहे त्यासोबर फ़ाईल डाऊनलोड करुन उघडल्यास हा व्हायरस स्वत:चे प्रताप चालू करतो. मॅकेफ़ी अँटीव्हायरस कंपनीच्या संशोधनानूसार हा व्हायरस स्वत:च्याच कॉपी तयार करण्याचे, नव्या रेजिस्ट्री तयार करण्याचे तसेच पासवर्ड चोरी करण्याचे उद्योग करतो. या व्हायरसच्या निर्मात्याला फ़िलिपाईन्स पोलिसांनी अटक केली होती. पण त्यावेळी या देशात कोणतेच सायबर कायदे अस्तित्वात नसल्याने त्याला शिक्षा झाली नाही.
क्रमांक ८- क्लेझ
सन २००१ मध्ये या व्हायरसची निर्मिती झाली. ईमेलद्वारे वेगाने प्रसार झाल्यावर अनेक हॅकर्सनी या व्हायरसवर प्रयोग केले आहेत. ’स्पूकिंग’ नावाची संज्ञा याच व्हायरसने अस्तित्वात आणली त्यात एखाद्या व्यक्तिच्या मेल बॉक्स मधून पाठवले जातात, पण तो मेल कुणाकडून आला आहे, याची माहिती मेल प्राप्त करणाऱ्यास मिळत नाही. त्यातूनच ’जंकमेल’ वा ’स्पॅम मेल’ची संख्या वाढत जाते.
क्रमांक ७- कोड रेड व कोड रेड २
या दोन्ही व्हायरसची निर्मिती सन २००१ मध्ये झाली. संगणकातील ऑपरेटिंग सिसिस्ट्मवर मोठ्या प्रमाणावर भार देण्याचे काम या व्हायरसनी केले. विंडोज २००० व विंडोज NT या संगणक प्रणालींना खराब करण्याचे काम प्रामुख्याने या दोन व्हायरसनी केले आहे. हे व्हायरस कार्यान्वित झाल्यावर अमेरिकेच्या व्हाईट हाऊसमधील वेब सर्व्हरला आपोआप मेल पाठवत राहयचे. शेवटी मायक्रोसॉप्ट कंपनीनेच यावर उपाय सुचवून आपल्या संगणक प्रणालींसाठी ’पॅच’ तयार करायचे ठरवले. त्यानंतर ही या व्हायरसचे उड्योग मात्र बंद पडले नाहीत.
क्रमांक ६- निमडा
इंटरनेटद्वारे प्रसार झालेला हा व्हायरस सन २००१ मधील निर्मिती आहे. ’अँडमिन’ या इंग्रजी शब्दाचा उलटा उच्चार ’निमडा’ असा होतो. याच काळात इंटरनेटद्वारे सर्वात वेगाने प्रसारित झालेला हा व्हायरस होय. त्याने केवळ २२ मिनिटांत इंटरनेट जगतात आपले बस्ताने मांडले होते. संगणकावर ’ Administrator’ म्ह्णून लॉगीन झाल्यावर हा व्हायरस सर्व हक्क स्वत:कडे ठेऊन तो संगणक वापरण्याचे सर्व हक्क मर्यादित करण्याचे काम करायचा. व्हायरसच्या ’वर्म’ या गटात मोडणारा हा व्हायरस होय.
क्रमांक ५- एस.क्यू.एल. स्लॅमर/ सॅफ़ायर
सन २००३ च्या जानवारी महिन्यात या व्हायरसचा जन्म झाला त्यावेळी अँटीव्हायरस सॉफ़्ट्वेसर च्या क्षमतांची कमतरता पाहूनच या व्हायरसची निर्मिती करण्यात आली होती.बॅंक ऑफ़ अमेरीकेचे >>>> व्हायरसने नष्ट केले. तसेच कॉन्टिनेंटल एअरलाईन्सला या व्हायरसच्या अटॅकमुळे आपली सर्व उड्डाने रद्द करावी लागली होती. अँटिव्हायरस कंपन्यांनी आपले अपडेट्स पाठवण्यापूर्वीच या व्हायरसने १०० कोटी डॉलर्सचे नुकसान केले होते. हा व्हायरस कार्यान्वित झाल्यानंतर जवळपास प्रत्येक पंधरा मिनिटांत इंटरनेट विश्वातील आपली व्याप्ती दुप्पट करत होता. जवळपास ५० टक्के वेबसर्व्हरवर त्याने आपले आक्रमण केले पण या व्हायरसने एक चांगला धडा शिकवला. कोणत्याही संगणकात अँटीव्हायरसने अत्याधुनिक अपडेट्स असायलाच हवेत. अर्थात prevention is better than cure म्हणतात ते हेच.
क्रमांक ४- मायड्रम
’वर्म’ या प्रवर्गात मोडणारा हा व्हायरस ’नोव्हार्ग’ या नावानेही ओळखला जातो. १ फ़ेब्रुवारी २००४ ते १२ फ़ेब्रुवारी २००४ या बारा दिवसात मायड्रमचे स्वत:चे ईप्सित साध्य केले. यानंतरही तो बऱ्याच संगणकांत धूमाकुळ घालत होता. यानंतरच्या सर्च इंजिन कंपन्यांना त्याचा मोठा फ़टका बसला. ’गूगल’ सारख्या सर्च इंजिनवर त्याने बरेच शब्द ’सर्च’ पाठवले, जेणेकरून त्यांचा वेबसर्व्हर कमी वेगाने कार्य करेल. ’मॅसेजलॅब्ज’ च्या अहवालानूसार त्यावेळी प्रत्येक बारा ईमेल्समध्ये एका मायड्रमचा शिरकाव होत होता. क्लेझ व्हायरसप्रमाणेच ’मायड्रम’नेही स्पूफ़िंगचेच कार्य केले.
क्रमांक ३ – सॅसर व नेटस्काय
स्वेन जॅशन नावाच्या १७ वर्षीय जर्मन मुलाने हे दोन संगणकीय प्रोग्राम्स बनविले होते. दोन्ही वेगवेगळ्या पद्धतीने कार्य करणारे ’वर्म’ होते. सॅसर व्हायरसने मायक्रोसॉफ़्ट विंडोज वर आक्रमण केले. अन्य व्हायरसप्रमाणे तो ईमेलद्वारे पसरला नाही. परेटिंग ऑसिस्टिमध्ये कार्यान्वित झाल्यावर स्वत:चेच अपडेट्स हा व्हायरस डाऊनलोड करायचा. संगणक बंद करण्यावरही या व्हायरसने बंधने घातली होती. नेटस्काय व्हायरस प्रामुख्याने ईमेल विंडोज नेटवर्क द्वारे प्रसारीत झाला. स्पुफ़िंगच्या साह्याने २२०१६ बाईट्सची फ़ाईल तो ईमेलने पाठवायचा व स्वत:च प्रसार करायचा. जवळपास २५ टक्के संगणकात या व्हायरसने शिरकाव केला होता. शिवाय त्याचा निर्माता स्वेन जॅशन हा अल्पवयीन असल्याने त्याच्यावर मोठी कारवाई झाली नाही.
क्रमांक २ – लिप-ए
हॅकरसाठी संगणक विश्वात कोणतेच कार्य अशक्य नसते तेच लिप-ए या व्हायरसने सिद्ध केले. अँपल कॉम्प्युटर्स हि संगणक विश्वातील नावाजलेली सॉफ़्ट्वेअर व हार्डवेअर कंपनी होय. त्यांच्या संगणकावर केवळ त्यांचीच ’मॅक’ ही ऑपरेटिंग सिस्टिम चालते. कंपनीने आपल्या संगणकावर केलेल्या उपाययोजनांमुळे ’मॅक’ साठी व्हायरस तयार झालेले नाहीत. पण सन २००९ मध्ये काही हॅकर्सनी ’मॅक’ साठी लिप-ए या व्हायरसची निर्मिती केली. तो ’आयचॅट’ द्वारे एक सुंदर चित्र पाठवून द्यायचा. या व्हायरसने फ़ारसे नुकसान केले नसले तरी ’मॅक’ पण ’हॅक; होऊ शकतो. याची प्रचिती आली.
क्रमांक १ – स्टॅार्म वर्म
तुमच्या संगणकात अँटीव्हायरस नसेल तर एकदा तो टाका व संगणक स्कॅन करा. कदाचित एखादा तरी स्टॅार्म वर्म सापडेल. २००६ मध्ये तयार झालेला हा व्हायरस शेकडो पद्धतीने आपली ’कार्य’ करत आहे. सन २००९ मध्ये ईमेलद्वारे ‘230 dead storm batters Europe’ या विषयाने व्हायरसचा प्रसार झाला, त्यावरुनच त्याला स्टॅार्म वर्म हे नाव पडले. सन २००१ मध्ये याच नावाचा व्हायरस तयार झाला होता. पण दोघांचाही काहीच संबंध नाही. तुमच्या स्पॅम मेलमध्ये आजही हा व्हायरस दडलेला असेल. ’स्टॅार्म वर्म’ व्हायरस ’ट्रोजन हॅार्स या प्रवर्गात मोडतो. व्हिडिओ, ऑडिओ वेबसाईट्स, ब्लॅाग्ज याद्वारे वेगाने प्रसारित होणारा हा व्हायरस आहे.
अशा विविध व्हायरसपासून संगणकाचा बचाव करण्यासाठी एकच उपाय आहे, आपल्या अँटीव्हायरसला सतत काळाच्या प्रवाहासोबत ठेवणे . अर्थात, तो सतत अपडेट असणे आवश्यक आहे.
Thursday, June 10, 2010
मराठी भाषेची ताकद
From my mailbox:
मराठी भाषेची ताकद खालील २ लेखात पहा. प्रत्येक शब्द 'क' आणि 'प' पासून सुरु करुन येवढा मोठा परिच्छेद लिहिला आहे. जगातल्या कोणत्या इतर भाषेत अशी ताकद असेल ?
------- ------------ --------- --------- ------------ --------- ---------
केव्हातरी कोल्हापूरच्या कर्तव्यतत्पर केळकर काकांबद्दल काकांच्याच कचेरीतल्या केशवने काकूंसमोर कागाळी केली. काकू कावल्या. काकूंनी कपाटातून कात्री काढून काकांच्या कामाचे कोरे करकरीत कागद कचाकचा कापले. काकांचे कापलेले कागद केशवानेच कचऱ्यात कोंबून काकांच्याच किचनमध्ये ' कजरारे-कजरारे' कवितेवर कोळीनृत्य केले. काकूंनी कागद कापल्याचे कळताच काका कळवळले. काकांनीही कमालच केली. काकांनी काकूंचे काळे कुळकुळीत केस कात्रीने कराकरा कापले. काका काय करताहेत काकूंना कळेनाच! काकूंनी कर्कश्श किंचाळून कलकलाट केला.
काका काकूंची कसली काळजी करणार! काकांना कामाची काळजी. काकूंच्या कर्णकर्कश्श कोलाहलातही, केशवाने कचऱ्यात कोंबलेले कागदाचे कपटेन कपटे काढून काकांनी कचेरीकडे कूच केले. कचेरीच्या कामासाठी काकांनी कंबर कसली. कागदाच्या कापलेल्या कपट्यांचे काकांनी'कोलाज' करून कामकाज कार्यान्वयित केले. केशवाचे कारनामे कळताच काकांनी काट्यानेच काटा काढला. काकांनी केशवालाच कोलाजचे काम करण्यासाठी कुथवला. कपटी केशवने काकांवरच कामचुकारपणाचा कांगावा करून कामाचा कंटाळा केला. काकांनी कठोरपणे केशवाला कामावरून काढले. कासावीस काकूंनी कालच्या कडू कारल्याची कोशिंबीर कटाप करून काकांसाठी कच्च्या कैरीचे कोय काढून कालवण केले. काकांनीही करुणेने काकूंचे कृत्रिम केस कुरवाळले. केळकरांच्या कोकणस्थ कुटुंबात कर्तव्यापुढे कर्मकांड केव्हाही कनिष्ठच. कर्तव्यदक्ष काकांच्या कार्यकाळात कचेरीने कर्मरूपी किल्ल्याचे कीर्तिशिखर काबीज केले.
कामावरून काढलेल्या केशवाने कितीतरी काबाडकष्ट काढल्यावर कोल्हापूरच्या कॉम्रेड कणेकर कॉलेजने केशवाला कबड्डीचा कर्णधार केला. क्रिडापटू केशवाने कबड्डीतच करियर केले. कालच्या कागाळीखोर केशवाला काळानेच केला'कबड्डीतल्या किचकट कसरतींचा कर्ता'!
कथासार
-
क्रियेविण करिता कथन, किंवा कोरडेची कीर्तन,
कितीक किताब कष्टाविण, काय कामाचे
------- ------------ --------- --------- ------------ --------- --------- ------------ ---------
परवा पुराण-प्रसिद्ध पखवाज पंडित पुरोहित पंतांची पिवळी पगडी पुरंदरच्या पंधराशेव्या पायरीवरून पुण्यात पर्वतीच्या पाचव्या पायरीपाशी पर्णकुटीपासून पंधरा पावलांवर पहुडलेल्या पंकजच्या पोटावर पटकन पडली. पगडी पडलेली पाहताच पंत पुरंदरच्या पायथ्याशी पोलिसठाण्यात पळाले. पुरंदरच्या पोलिसांनी पंतांना पुण्याच्या पोलिसांकडे पाठवले.
पंत पुण्यात पोहोचताच पोलिसांवर पेटले. पंत पेटल्यामुळे पोलिस पटकन पर्वतीकडे पळाले. पांढर्या पोषाखातल्या पोलिसांना पाहून पंकज पर्वतीच्या पलिकडे पळाला. पोलिसांनी पंकजचा पिच्छा पुरवला. पळता पळता पंकज पाण्याच्या पाँडमध्ये पडला. पंतांनीच पाण्यात पोहून पंकजला पकडले. पिवळी पगडी पण पकडली. पोलिसांनी पंकजला पोलिसठाण्याकडे पिटाळले. पकडणारा पोलिस पदपथावर पाय पसरून पडला. पोलिस पडलेला पाहून पंकज पाठीवर पांघरूण पांघरून पळाला.
पंतांनी पुरंदरला पोहोचताच पगडीत पंकजचे पैशांचे पाकिट पाहिले. पाकिटातले पुष्कळ पैसे पंतांनी पनवेलला पुत्राला पोस्टाने पाठवले. पंतांच्या पाजी पुत्राने पैशांच्या प्राप्तीतून पोटात पंजाबी पदार्थ पचवले. पंतांना परमेश्वरच पावला! पंकजला पकडण्यासाठी पंतांसोबत पुण्यात पोहोचलेली पंतांची पोरगी प्राची पंकजला पहिल्यांदा पाहताच पंकजच्या प्रेमात पडली. प्राचीने पंकज, पोलिसांची पकडा पकडी पाहिली. पंकजचा पदपथावरून पोबाराही पाहिला. पानशेतच्या पुराच्या पाण्यामुळे पुनर्वसित पंकज परत पर्णकुटीत पोहोचला.
पित्यासमवेत प्राची पुरंदरला परतली, पण पंतांनी पंकजच्या पाकिटातल्या पैशांबाबत पंक्ति-प्रपंच पाळला. पुष्कळ पैसे पुत्राला पाठवले. पंतांच्या पुन्हा पुन्हा पिडणार्या पुराणांच्या पोपटपंचीमुळे प्राची पेटली. पंकजच्या प्रेमाखातर प्राची पुण्यास परतली. प्राचीनेच पंकजवरच्या पोलिसांच्या पंचनाम्याला पाने पुसली. पंकजला पहायला प्राची परत पर्णकुटीपाशी पोहोचली. पण पर्णकुटीत पहुडलेल्या पंकजचे पाय पळून पळून पांढरे पडलेले! प्राचीने पंकजच्या पायावर पिवळे पुरळही पाहिले. पंकजची परिस्थिती पाहून प्राण पिळवटलेल्या प्राचीने पदर पाण्यात पिळून पंकजचे पाय पुसले.
प्राचीचा प्रथमोपचार पाहून पंकजला पोरगी पसंत पडली. पंकजने प्राचीला पर्णकुटीतच पटवले. पर्णकुटीतील प्रेम-प्रकरण पाहून पर्णकुटीच्या पायर्यांवर पत्ते पिसणारी पोरे पूर्व-पश्चिमेला पांगली. प्राचीने पंकजचे पा़किट पैशांविनाच परतवले. परंतू प्रेमात पारंगत पंकजने प्राचीस पाच पाप्या परतवल्या. पंतांना परमेश्वर पावला, पण पंकजला पंतांची पायाळू पोर पावली.
------------ --------- --------- ------------ --------- ---------
ज्याने हे लिहिलं तो खरंच थोर !!
Saturday, April 24, 2010
आयपीएलचा वाद
गेल्या काही दिवसांपासून आयपीएलचा वाद भलताच रंगू लागला आहे. प्रत्येक राजकीय पक्ष आपल्या हक्काचं व्यासपीठ म्हणून त्यावर प्रतिक्रिया व्यक्त करत आहे. अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचे आयपीएल हे एक मोठे साधन असल्याने भारताची ही ’इंडियन पॉलिटिकल लीग’ सध्या भलत्याच रंगात आली आहे.
आयपीएलवर व आयुक्त ललित मोदी यांच्यावर सध्या जे आरोप होत आहेत, त्यात ते निर्दोष निश्चितच नाहीत, याची जाणीव सर्वाना आहे. भारतीय क्रिकेटचा त्यांनी खूप चांगला ’अर्थिक’ उपयोग करून घेतला व मोठ्या प्रमाणात क्रिकेटला ग्लॅमर मिळवून दिले शिवाय भारतीय क्रिकेटला जागतिक दबदबा प्राप्त करून दिला, यात शंका नाही. आयपीएल मध्ये ललित मोदींनी भ्रष्टाचार करून स्वत:चे उखळ पांढरे करून घेतले असेल तर त्यावर त्यांना योग्य ती शिक्षा निश्चितच व्हायला पाहिजे. व आयपीएल च्या सर्वच कारभाराची त्रयस्थपणे खोलवर चौकशी होणे गरजेचे आहे.
राष्ट्रीय पातळीवर आयपीएलचा प्रश्न ज्याप्रकारे पाहिला जात आहे, त्यावरून मात्र हसायला येते. स्वत: करोडोंचा भ्रष्टाचार करणारे नेते आयपीएलच्या मागे हात धुवून लागले आहेत. जणू काही त्यांना त्यांचा ’हिस्सा’ मिळालेला नाही! अन्य काही नेते आयपीएल मध्ये गुंतले असल्याचे सर्वांनाच ज्ञात आहे. ते आता सहजपणे सुटतील, याची १०० टक्के खात्री आमच्या सारख्या सर्वसामान्य क्रिकेटप्रेमींना आहे! परंतु, आयपीएल मध्ये हिस्सा असलेल्या नेत्यांनी जी काही ’कमाई’ केली असेल त्याची जलन सध्या अन्य नेत्यांना होत असल्याचे दिसते. त्यांनीच का खावे? आम्ही का नाही? अशी अन्य नेत्यांची भावना झाली आहे. त्यामुळेच ते आयपीएलच्या मागे हात धुवून लागले असावेत. बिहारमधल्या एका प्रसिद्ध नेत्याने आयपीएलच बंद करण्याचे फर्मान काढले होते. कदाचित, त्यांच्या पाटणासाठी नवा आयपीएल संघ मिळाला नसल्याने ते ’फ्रस्ट्रेट’ झाले असावेत.
आयपीएलवर आरोप करणारा प्रत्येक नेता मोठा भ्रष्टाचारी आहे. परंतु, सध्या ते स्वत:ला धुतल्या तांदळासारखे स्वच्छ असल्यासारखे भासवत आहेत. काहींनी आयपीएल सरकारच्या नियंत्रणाखाली आणण्याची मागणी केली आहे. जर असे झाले तर क्रिकेटच्या इतिहासातील तो एक वाईट दिवस असेल. देशातला प्रत्येक नेता कुत्र्यासारखे लचके तोडून खाण्याचा प्रयत्न करेल. सध्या तरी आयपीएलला राजकारण्यांपासून दूर ठेवणे गरजेचे आहे. तिथे एका प्रामाणिक व कुशल अधिकाऱ्याची नितांत गरज असल्याचे दिसते. आयपीएलवर बंदी हा कधीच उपाय होऊ शकत नाही.
Wednesday, March 3, 2010
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
आपल्या मराठीदिनी अर्थात २७ फेब्रुवारीला मराठी अभिमान गीत सादर करण्यात आले. सुरेश भटांनी लिहिलेल्या या गीताला कौशल इनामदार यांनी संगीत दिले आहे. सर्वप्रथम ’स्टार माझा’ वर हे गीत जेव्हा सादर झाले तेव्हा खूप छान वाटले. एक गीत ११२ गायक व ३५६ समूह-गायकांनी गायले आहे, व ते गीत मराठी आहे याचा विशेष आनंद वाटला. मराठीतील सर्वच गायक यात गायले आहेत. मराठीत गाणारे अमराठी गायक हरिहरन, शंकर महादेवन, महालक्ष्मी अय्यर, हंसिका अय्यर यांना पाहून खरोखर ’लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी’ याची प्रचिती आली. हे गीत शब्दबद्ध करावेसे वाटले...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फुलाफुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी...
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
धर्म पंथ जात एक जानतो मराठी
एवढ्या जगात माय मानतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या मना मनात दंगते मराठी
आमच्या रगा रगात रंगते मराठी
आमच्या उरा उरात स्पंदते मराठी
आमच्या नसा नसात नाचते मराठी॥
आमच्या पिलापिलात जन्मते मराठी
आमच्या लहानग्यात रांगते मराठी
आमच्या मुलामुलीत खेळते मराठी
आमच्या घराघरात वाढते मराठी
आमच्या फुलाफुलात नांदते मराठी
येथल्या फुलाफुलात भासते मराठी
येथल्या दिशा दिशात दाटते मराठी
येथल्या नगा नगात गर्जते मराठी
येथल्या दरीदरीत हिंडते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या दरीदरीत धुंदते मराठी
येथल्या वनावनात गुंजते मराठी
येथल्या तरुलतात साजते मराठी
येथल्या कळीकळीत लाजते मराठी॥
येथल्या नभामधुन वर्षते मराठी
येथल्या पिकांमधुन डोलते मराठी
येथल्या नद्यांमधुन वाहते मराठी
येथल्या चराचरात राहते मराठी॥
लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी
जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी
बोलतो मराठी ऐकतो मराठी
जाणतो मराठी मानतो मराठी
दंगते मराठी... रंगते मराठी.. स्पंदते मराठी.. स्पर्शते मराठी.. गुंजते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी.. गर्जते मराठी...
Saturday, February 27, 2010
A crore salutes to you… Sachin

Who is the greatest ever cricketer on this planet? No one will hesitate to answer this question. That’s Sachin Tendulkar…
Currently, at the age 37, he is in his top form of ever seen. I thank and congratulate Sachin for entertaining us and feeling us proud that we are also Indians like you! The day on which Sachin has made first ever double ton in one day international cricket, was one of the historical day in world cricket. That day, I was in college and was watching the score online on rediffmail.com. When I saw that after the wicket of Sehwag, Sachin was moving towards his century very fast, I realized that he will complete his century now. But, as we Indians does not satisfy the performance of our cricketers. I also did not satisfy with that. I told to one of my colleague that, if Sachin won’t make double century today, there will not be any use of his career till! But, it was just a fun. I think I was having full confidence on Sachin’s abilities… that was reflected by my quote.
While leaving the college at 5pm, Sachin had crossed 150 runs. That day, I had traveled through the bus. When I entered the bus stop, I sent SMS to Amit for the score. He replied that Sachin is playing on 199 not out. I was too exited that time. I called my friend Arjun for score. He told me the score live! That Sachin has completed his double ton. It was a proud moment for all of us Indians. I sent the message of Sachin’s this achievement to all of my friends. When I reached to the mess for dinner, I saw the highlights of Sachin’s innings. One news channel was showing his innings in 20 minutes and one was in just five minutes! But I enjoyed it.
Next day, I read almost all the leading Marathi, English and Hindi news papers. I also read the online news portals and newspapers from England, Australia. They also praised Sachin’s achievement. On the esakal’s website, nearly 400 replies were found on the news of Sachin Tendulkar. He is just great. In the local news paper Gavkari, I read a poem composed by an advocate. It was very nice. I am writing it here…
थकून जातं वादळ!
तेही तुझ्या वेगाने धावत नाही,
इतिहासाच्या पुस्तकातही
नोंद विक्रमांची मावत नाही.
तुझ्यापुढे ठेंगणं वाटतं
म्हणून उंच व्हावं आकाशानं
अपुऱ्या पडतायेत दाही दिशा
म्हणून मोठं व्हावं नकाशानं
जेथे अस्त होतो इतरांचा
तेथुनच तुझा उगम होतो
तू जेथे उभा तेथेच
यश आणि किर्तीचा संगम होतो
तुझी महती वर्णू कशी?
तेवढं समर्पक वाक्य नाही
कारण, सूर्याची किरणं मोजणं
आम्हाला तरी शक्य नाही!
सचिन तेंडुलकरच्या नाबाद २०० धावांच्या विक्रमानंतर नाशिकच्या दैनिक गांवकरीमध्ये एड्व्होकेट श्री. अनंत खेळकर यांनी लिहिलेली ही कविता...
Subscribe to:
Posts (Atom)





