आरोग्य सेवेला तंत्रज्ञानाची जोड मिळाल्यामुळे जीवन अधिक सुखकर होत असताना दिसत आहे. विविध प्रकारच्या उपकरणांमुळे मानवी शरीराची रचना तसेच त्यातील आजार ओळखण्यास मदत होताना दिसते. असेच नवे उपकरण आता तंत्रज्ञांनी शोधलेले आहे. शरीरातील रक्त वाहून नेणाऱ्या रक्तवाहिन्या शोधणारे हे यंत्र आपल्या सर्व चाचण्या सहजपणे पार करून वैद्यकीय सेवकांसाठी उपलब्ध करण्यात आलेले आहे. याद्वारे शरीरातील रक्त वाहून नेणाऱ्या शिरा शोधण्याचे काम अतिशय सहज आणि सोपे झाल्याचे दिसते. रुग्णालयात दाखल झालेल्या रुग्णांना रक्तवाहिन्यांद्वारे औषधांचा पुरवठा केला जातो. अशावेळी या रक्तवाहिन्या शोधण्याचे काम काही प्रमाणात अवघड आणि जिकिरीचे असते. परंतु तंत्रज्ञानाने यावर अतिशय अचूक उपाय शोधलेला आहे. लहान मुले, वृद्ध आणि लठ्ठ व्यक्तींच्या रक्तवाहिन्या लवकर सापडत नाही. त्यामुळे सुईद्वारे त्यांना देण्यात आलेले औषध बाहेर जाण्याची शक्यता असते. म्हणूनच या शिराशोधक किंवा रक्तवाहिनी प्रदीपन यंत्रामुळे आता वैद्यकीय क्षेत्रात कार्य करणाऱ्या लोकांना आपले प्राथमिक कार्य करणे सोपे होणार आहे.
Showing posts with label health. Show all posts
Showing posts with label health. Show all posts
Monday, August 12, 2024
Friday, August 28, 2020
आरोग्य आणि शिक्षण
जगापुढे कोरोना सारख्या महामारीचे संकट उभे असताना वर्ल्ड
हेल्थ ऑर्गनायझेशन व युनिसेफ यांनी नुकताच एक शालेय विद्यार्थ्यांच्या
आरोग्य विषयीचा अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यानुसार जगातील ३३ टक्के
शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. जरी यातील एक तृतीयांश
शाळा या आफ्रिकेतील वाळवंटी प्रदेशातल्या असल्या तरी बहुतांश शाळा या
भारतातील देखील आहेत. स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर देखील अनेक भारतीय
शाळांमध्ये अजूनही पिण्याच्या पाण्याची सुविधा व्यवस्थित उपलब्ध होऊ शकलेली
नाही. तशीच परिस्थिती हात धुण्याच्या पाण्याची व साबणाचीही आहे.
भारतामध्ये इंग्रजी माध्यमांच्या शाळांचं फॅड वाढत चालले असताना सरकारी व
अनुदानित शाळांकडे मात्र दुर्लक्ष होताना दिसत आहे. विद्यार्थ्यांना
शाळेमध्ये लागणाऱ्या मूलभूत सुविधा देखील उपलब्ध होताना दिसत नाहीत. शासकीय
शाळांना दरवर्षी अशा विविध कामांसाठी शासनाकडून अतिशय तुटपुंजी रक्कम दिली
जाते. त्यामुळे शाळांमध्ये सुविधा उपलब्ध करता येत नाहीत. गावातील नागरिक
जर सुजान असतील तर तेच लोकसहभागातून व वर्गणी द्वारे शासकीय शाळांच्या
सुधारणा करत आहेत. नागरिकांचे जरी हे कर्तव्य असले तरी शासनाची ही जबाबदारी
आहे. भारतासारख्या प्रगतीशील देशांमध्ये शिक्षणाचे बजेट अतिशय कमी आहे.
त्यामुळेच शिक्षणाला व शिक्षण मंदिराला दुय्यम स्थान दिले जाते.
Subscribe to:
Posts (Atom)