Showing posts with label icecream. Show all posts
Showing posts with label icecream. Show all posts

Thursday, February 26, 2026

कावरे आईस्क्रीम

हॉटेलवर आईस्क्रीम उपलब्ध नसल्याने आम्ही दिवेआगारमध्ये कुठे आईस्क्रीम मिळते का? हे पाहायला बाहेर पडलो. पूर्ण गावामध्ये एका ठिकाणी रात्री आईस्क्रीमचे दुकान उघडे असलेले दिसले. त्यावर "कावरे आईस्क्रीम"चा फलक होता. शिवाय गर्दी देखील बऱ्यापैकी होती. त्यादिवशी बऱ्याच वर्षांनंतर कावरे आईस्क्रीमचे नाव पुनश्च पाहायला मिळाले. एकेकाळी गावांमध्ये देखील या कंपनीची आईस्क्रीम मिळत असत. परंतु मध्यंतरीच्या काळामध्ये काय झाले कुणास ठाऊक, या कंपनीचे आईस्क्रीम्स मागे पडले आणि नव्या कंपन्या उदयास आल्या. आजही या आइस्क्रीमची चव तशीच आहे. परंतु त्याचा प्रसार ज्या प्रमाणात व्हायला हवा होता, तो झालेला नाही. महाराष्ट्रातल्या मातीतील ७० वर्षांपूर्वीचा हा ब्रँड अजूनही मोठा झालेला नाही. पुण्यासारख्या शहरांमध्ये अजूनही अगदी हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच आउटलेट्स आपल्याला पाहायला मिळतात. नक्की काय कारण असावे?

--- तुषार भ. कुटे